बंधू आणि भगिनींनो..💐

कोरोना काळात आपले कामगार बंधू ऑफ़शोर मध्ये जवळ-जवळ 60 ते 65 दिवस कर्तव्यावर असतांना त्यांना ओव्हर टाईम देणे न्यायपूर्ण होते परंतु किती दिवसांचा द्यायचा यासाठी तडजोड करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यावेळी कर्मचारी संघटना देश संकटात आहे ओव्हर टाईम मागणे सोयीचे नाही वगैरे-वगैरे व्यवस्थापणाच्या बाजूने बोलत होती. तेव्हा पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन कडून सदरील मुद्दा ताकदीनिशी व गंभीरपणे उचलण्यात आला तेव्हा ही कामगार विरोधी कर्मचारी संघटना ने 28 दिवसावरील ओव्हर टाईम देवून सदर विषय संपवावा असे मत व्यक्त केले पण पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन कडून 14 दिवसानंतरच्या दिवसांचाच ओव्हर टाईम मिळाला पाहिजेत या मतावर ठाम आहोत असे ठणकावून सांगितले. तेव्हा तत्कालीन परिस्थती नुसार तात्पुरती तडजोड व्हावी म्हणून पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने व्यवस्थापणेकडून 21 दिवसा नंतरच्या दिवसांचा ओव्हर टाईम पास करवून घेतला.

नंतरच्या काळात 14 ते 21 दिवसामधील उर्वरित 7 दिवसाच्या ओव्हर टाईम वर झाकण टाकण्याचा प्रयत्न कामगार विरोधी मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना करीत असतांना कामगारांना उद्देशून “आता कोणता ओव्हर टाईम बाकी राहिला आहे..? सगळा ओव्हर टाईम आपणास मिळालेला आहे.” असे बोलून व व्यवस्थापणास पाहिजेत तसे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न कर्मचारी संघटनेने केला पण सदर कामगार विरोधी प्रयत्न पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन ने हाणून पाडला व उर्वरित 14 ते 21 दिवसांमधील 07 दिवसांचा ओव्हर टाईम मिळावा म्हणून वारंवार RLC कडे त्यासंबंधी पाठपुरावा करत राहिली.

राहिलेल्या 07 दिवसांचा ओव्हर टाईम मिळावा म्हणून त्यावेळी सर्वप्रथम पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने लेबर कमिशनर कडे दाद मागितली होती. तब्बल 2 वर्षे पेंडीग असलेल्या या विषयावर चर्चा करण्यासाठी दिनांक 24/08/2023 रोजी लेबर कमिशनर साहेबांच्या कार्यालयाने पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या नावे पत्र पाठवले असून त्यामध्ये वरील 07 दिवसांच्या राहिलेल्या ओव्हर टाईम बाबत दिनांक 05 ऑक्टोबर, 2023 रोजी चर्चा करण्यासाठी बोलावले आहे.

शक्य तितक्या लवकर आपल्याला न्याय देण्यात यावा व आपल्या हक्काच्या ओव्हर टाईमचा राहिलेला मोबदला आपल्याला मिळावा अशी ठाम बाजू आपण आधीपासूनच मांडत आलो आहोत आणि अंतिमतः आपल्या प्रयत्नांना यश मिळेल यात तिळमात्र शंका नाही. तेव्हा सवयीप्रमाणे सदरील प्रयत्नांती मिळालेल्या यशाचं श्रेय घ्यायला कामगार विरोधी मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना येणारच आहे. तेव्हा आपण जागरूक राहणं गरजेचं आहे.

कामगार हितांसाठी झटणारी एकमेव युनियन म्हणजे पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन🚩🚩🚩

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.