प्रिय बंधू आणि भगिनींनो💐

दिनांक ०७/१२/२०२३ रोजी कोविड-१९ काळातील ऑफशोअर एम्प्लॉईजचा बाकी असलेल्या ०७ दिवसांच्या OT संदर्भात कन्सिलेशन मीटिंग पार पडली.

सदर मीटिंग दरम्यान २१ दिवस ड्युटी करण्याबाबतची ऑफिस ऑर्डर आहे अशी माहिती व्यवस्थापनाकडून मा. श्रम आयुक्त यांना युक्तिवादा दरम्यान देण्यात आली. पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मा. संतोष पाटील साहेबांनी त्याकाळात ०७ दिवसांचा OT मिळणार नसल्याची कोणतीही ऑफिस ऑर्डर नाही आणि जर असेल तर सादर करण्यात यावी अशी मागणी केली. दरम्यान अशी कोणतीही ऑफिस ऑर्डर व्यवस्थापनाकडे उपलब्ध नसल्याने मा. सहाय्यक श्रम आयुक्त(ALC) यांनी व्यवस्थापनाला पुढील कन्सिलेशन मीटिंगच्या वेळी अशी कोणतीही ऑफिस ऑर्डर असल्यास सादर करावी असे निर्देश दिले आहे. तत्पूर्वी मा. संतोष पाटील साहेबांनी Change Of Service करत असतांना पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनला वरील बदल करतेवेळी सामील करण्यात आले नसल्याच्या मुद्द्यावर जोर दिला

मा. संतोष पाटील साहेबांनी व्यवस्थापन जर आपल्या कायदेशीर देयांबाबत (ओव्हरटाईम) जर अशी उदासीनता दाखवत असेल तर पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन कडून या बाबतीत कठोर पाऊले उचलत संप(Strike) पुकारण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

सदर बाबतची पूर्वसूचना व कन्सिलेशन मीटिंगची पुढील तारीख कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी..

संतोष ज. पाटील
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन
ओ.एन.जी.सी, मुंबई🚩🚩

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.