✌️✌️🚩वचनपुर्ती🚩✌️✌️

प्रिय बंधू आणि भगिनींनो💐,

४००००/- पेक्षा कमी बेसिक असलेल्यांना फक्त अर्धाच CPP मिळत होता.

पूर्ण CPP न मिळाल्याने आपल्या ऑफ़शोरच्या कामगार बंधू आणि भगिनींचं बऱ्यापैकी नुकसान होऊन आर्थिक झळ बसत होती.

कामगारांचे एवढे आर्थिक नुकसान होत असतानाही तत्कालीन मान्यताप्राप्त युनियन ने याबाबत काहीही केले नाही.

निवडणुकीपुर्वी PEU ने घेतलेल्या V.C. मध्ये जेव्हा हा मुद्दा विचारण्यात आला , तेव्हा PEU च्या General secretary श्री. संतोष पाटील साहेबांनी घोषणा केली होती की,
” यंदाच्या निवडणुकीत PEU मान्यताप्राप्त झाल्यास ६ महिन्यात CPP साठी बेसिक चे बंधन हटविण्यात येइल, आणि सर्वांस पुर्ण CPP मिळेल.”

आपण CPP बाबतीत 40,000 बेसिक पे चं बंधन नसले पाहिजेत म्हणून व्यवस्थापनापुढे मोठ्या ताकदीने हा ज्वलंत मुद्दा ठेवला व त्याची फोड करून सांगितलं की, कशाप्रकारे कामगार बंधू आणि भगिनी पूर्ण CPP घेण्यास पात्र आहेत त्यांना सोसावी लागत असलेली आर्थिक झळ व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली.

PEU ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे आणि त्यानुसार offshore मध्ये काम करणाऱ्या सर्वाना पूर्ण CPP मिळेल व त्यासाठी कोणत्याही बेसिक पे चे बंधन नसणार आहे.

दि.२५.०१.२४ पासुन PEU मान्यता प्राप्त झाली आहे , आणि दिलेल्या वचनानुसार ६ महिन्यांच्या आतच कामगारांच्या सदर समस्येचे यशस्वीरित्या निराकरण केले आहे.


  • संतोष ज. पाटील
    जनरल सेक्रेटरी
    पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन
    डब्लू.ओ.यु, ओ.एन.जी.सी,मुंबई🚩🚩

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.