बंधू आणि भगिनींनो,

आज दिनांक. ०७/०५/२०२४ रोजी ग्रीन हाईट येथे चीफ ER श्री.अस्थाना साहेब यांच्या कार्यालयात मुंबई येथे तातडीची बैठकी आयोजित करण्यात आली होती.

सदर मीटिंग मध्ये अस्थापणेने ऑफशोअर मध्ये मॉन्सून काळात असलेले हेलिकॉप्टर दळणवळण कमी करण्याच्या उद्देशाने सध्या असलेला १४ दिवसांचा DUTY PATTERN बदलून स्टाफ एम्प्लॉइज करिता मॉन्सून काळात २१ दिवस करण्याकरिता युनियन ची परवानगी मागण्याचा प्रयत्न केला.

ही बाब समजल्यावर २१ दिवसांकरिता असलेली ही सर्व हालचाल आपल्या सर्व नियम व पॉलिसी च्या विरोधात असून अश्या पॅटर्न करिता आपला ठाम विरोध असल्याचे तसेच केवळ सुरक्षिततेचे कारण पुढे करीत अश्या प्रकारचा DUTY PATTERN बदलणे अवाजवी व आधीच दडपणाखाली असलेल्या आपल्या एम्प्लॉइज करिता अजुन शारीरिक आणि मानसिक दडपण टाकण्या सारखे आहे.

तसेच यापूर्वी झालेल्या विवध हेलिकॉप्टर अपघातां करिता कोणत्याही प्रकारे WEATHER CONDITION जबाबदार नव्हती याचा देखील खुलासा केला.

आणि जोरजबरदस्ती अश्या प्रकारचे पॅटर्न बदलल्यास आपण उग्र आंदोलनाचा बडगा उगारून या भूमिकेचा कडाडून विरोध करू असे ठणकावण्यात आले.

ऑफशोअर मध्ये आपणही असे कोणतेही प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित युनियनशी संपर्क साधावा.

पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
WOU, मुंबई.

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.