Union Election 2023:

प्रिय बंधू आणि भगिनींनो,💐💐

आपल्याला गेले कित्येक दिवस प्रतिक्षीत असलेली, आपल्या मागण्या हक्कासाठीचा एकमेव मार्ग म्हणजेच मान्यताप्राप्ती आणि ती मिळवून देणारी निवडणूक आता घोषित करण्यात आली असून पुढील २९ ऑगस्ट पासून आपल्या या लढ्याची सुरुवात होणार आहे तरी आपण सर्वांनी या लढ्याकरीता आपल्या संघटनेबरोबर खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याची वेळ आता आली आहे.

लवकरच आपल्याशी संवाद साधू.

संतोष ज. पाटील
🚩पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,🚩
🚩ओ.एन.जी.सी, मुंबई🚩

🙏जाहीर आभार 🙏

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन ने ओ एन जी सी उरण सयंत्र येथे दि.24.03.2023 रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते . त्या शिबिरास आपण भरभरून प्रतिसाद देऊन 607 रक्तदात्यांनी रक्तदान करून आमच्या कार्यावर जो विश्वास दाखवलात त्या बद्दल सर्व कामगारांचे तसेच रक्तदात्यांचे आम्ही सर्वस्वी मनापासून आभार मानतो.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन

🚩 आज वासुधारा भवन येथे पी ई यू मुंबई तर्फे शिवजयंती धूम धडाक्यात साजरी केली गेली.

सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🚩

HBA WEBICE ISSUES ##

मित्रानो ,

ओएनजीसी त Loans & Advance संबंधित सर्व प्रक्रिया online झाल्या. तेव्हापासून बऱ्याच staff employees ना HBAची मर्यादा व Repaying Capacity खुप कमी दाखवत होती. HBA ची रक्कम कमी मिळत असल्यामुळे बऱ्याचजाणाना अडचणी येत होत्या त्याची दखल घेऊन P.E.U. चे General Secretary श्री. संतोष पाटील साहेब यानी Loan & Advance section व ICE-Team Delhi शी संपर्क साधुन Online loan Processing मधील त्रुटी लक्षात आणून दिल्यात, तसेच एम्प्लॉईज ची Eligibility व repaying capacity जास्तीत जास्त व्हावी ज्यामुळे त्यांना अधिकाधिक HBA मिळू शकेल यासाठी काही सुधारणा सुचवल्या. याची दखल घेवून व्यवस्थापनाने online process मध्ये या सुधारणा केल्यामुळे आता HBA ची eligibility व repaying capacity revise झाली आहे. काही एम्प्लॉईज ला अजूनही काही अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी ही P.E.U. चे प्रयत्न करत असून लवकरच positive result अपेक्षित आहे.

🙏Team PEU🙏

PEU letter regarding ODL calculation for year 2022

🙏Team PEU🙏

मित्रांनो ,

आपल्या 24/03/2020 ते 11/04/2021 या कालावधी मधील १४ दिवसांपासून ते २१ दिवसांपर्यंतचा प्रलंबित ओव्हरटाईम संदर्भात आता आपल्या संबंधित OIM व रिग इन्चार्ज कडे आपण पाठवलेली एम्प्लॉइज ची लिस्ट व्हेरिफिकेशन साठी पाठविण्यात आलेली आहे तरी आपण आपल्या संबंधित अधिकाऱ्यांशी (OIM/RIG INCHARGE) संपर्क करून पडताळणी करून आपापल्या नावांची खात्री करून घेणे.

श्री. संतोष पाटील, जनरल सेक्रेटरी,P.E.U.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Letter for pending Med-Bills, PME and Biometric

🚩मित्रांनो 🚩

ऑफशोअर मधील आपल्या बंधू आणि भगिनीनी COVID 19 च्या काळामध्ये केलेल्या 14 दिवसां वरील ओव्हरटाईम संदर्भात मागील काही काळाचा इतिवृतांत:

मित्रांनो आपल्याला १२/०४/२०२१ नंतरचा ओव्हरटाईम हा १४ दिवसांनंतर मिळाला परंतु २३/०३/२०२० ते ११/०४/२०२१ या काळातील ओव्हरटाईम जो २१ दिवसांच्या वर देण्यात आला, तो देखील १४ दिवसांनंतरच मिळावा ही मुख्य भूमिका घेऊन फक्त आणि फक्त पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियनच मा श्रम आयुक्त यांच्या दालनात दाद मागण्या करिता उभी राहिली.


कामगारांच्या हक्काला बगल देण्याकरिता अस्थपणेने काही लोकांना हाताशी घेऊन या विषयाच्या काही सूनवण्या जाणूनबुजून टाळल्या आणि गैरहजर राहून याला दिरंगाई करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर देखील या ना त्या कारणाने( या काळातला OT आम्ही दिला, नाही दिला असेल त्यांच्या नावे द्या आणि अशी चालढकल करणारी उत्तरे देत)विषय भरकटवण्याच प्रयत्न केला.
परंतु आता मात्र यामध्ये आपला संयम तुटत असून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी परखड भूमिका श्री संतोष पाटीलसाहेब यांनी दि.०७/०९/२०२२ च्या सुनावणी दरम्यान मांडली ज्यामुळे मा. श्रम आयुक्त यांनी अस्थापणेला युनियन बरोबर मीटिंग करुन ठोस निर्णया सह पुढील तारखेस उपस्थित राहण्याचे ठणकावले आहे.

RLC बरोबर झालेल्या conciliation meeting मधील चर्चा खाली👇 जोडलेल्या attachment मध्ये आहे

आपल्या न्याय हक्कासाठी पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन कोणत्याही व्यवस्थेचे दरवाजे ठोकवण्याकरिता कुठेही कमी पडणार नाही.

पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन,
मुंबई 🚩🚩🚩🚩